Nagpur News: नोंदणी ५० हजारांची; खरेदी केवळ ३ हजारांकडून ; खरीप हंगामातील धान खरेदीची आशा मावळली ः रब्बीच्या धान खरेदीसाठी आदेश जारी

Government Orders for Rabi Season Rice: नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदीत फक्त ३ हजार शेतकऱ्यांकडून खरेदी; ५० हजारांहून अधिक नोंदणी असून खरीप हंगामाची आशा मावळली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: खरीप हंगामातील धान खरेदीसाठी शासनाने मर्यादा आखून दिली. यासाठी जिल्ह्यात ५० हजार ८८० शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली. मात्र, गत तीन महिन्यांत हमी दरात केवळ ३ हजार २४२ शेतकऱ्यांकडूनच धानाची खरेदी करण्यात आली.

शासनाने रब्बी हंगाम धान खरेदीसाठी मान्यता दिल्याने आता खरीप हंगामातील धान खरेदीची आशा मावळली आहे. खुल्या बाजारात धानाचे दर कोसळले असताना शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com