नागपूर : प्रेमाचे आमिष दाखवून दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आले. तब्बल चार महिन्यांनंतर ही तरुणी घरी परतली. तिने प्रसंगावधान राखत अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ऑटोचालक युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.