
अमरावती : जिल्ह्यातील अंजनगावसुर्जीनंतर आता अमरावती शहरातसुद्धा बांगलादेशी व रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (ता.१८) रोजी अचानक अमरावती शहरात दाखल होत तहसीलदार तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेत त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.