नागपुरात निर्बंध शिथिल! सर्व दुकानांची वेळ सकाळी ७ ते २

नागपुरात निर्बंध शिथिल! सर्व दुकानांची वेळ सकाळी ७ ते २

नागपूर : बाधित तसेच बळींची संख्या नियंत्रणात (Nagpur Corona Update) आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून आता अत्यावश्यक सेवेसह (Essential services) सर्वच दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उद्यापासून नव्या नियमावलीची अंमलबजावणी (New Rules of lockdown) केली जाणार असल्याने अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील, असे महापालिका आयुक्तांनी (Collector Office Nagpur) काढलेल्या आदेशात स्पष्ट केले. शॉपिंग सेंटर, मॉल बंदच राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी बंद राहणार असून केवळ होम डिलिवरी करता येणार आहे. (know about new rules of lockdown in Nagpur from 1st june)

नागपुरात निर्बंध शिथिल! सर्व दुकानांची वेळ सकाळी ७ ते २
'तो' बिबट्या नक्की गेला तरी कुठे? तीन दिवस उलटूनही शोध लागेना

शहरात गेल्या काही दिवसांत बाधित तसेच कोरोनाबळींच्या संख्येचा आलेख खाली आला. त्यामुळे विविध दुकानदार असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे दुकाने सुरू करण्यासाठी निवेदन दिली. दरम्यान काल राज्य सरकारने निर्बंध शिथिल करीत दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. राज्य सरकारचे आदेश आज महापालिकेत धडकले. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्बंध शिथिल केल्यासंबंधी आदेश आज सायंकाळी काढले.

त्यानुसार अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील, असे स्पष्ट केले. परंतु अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवारी व रविवारी बंद करावी, असेही त्यांनी नमुद केले आहे. परंतु सोमवार ते शुक्रवार ही दुकाने सुरू राहणार असल्याने शहरातील हजारो दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आठवडाभर सुरू राहणारी दुकाने

किराणा, औषधी, दूध, भाजीपाला, डेअरी, पॅकेटबंद खाद्य पदार्थांची दुकाने, मटन, चिकन, अंडी, फळे, खते, बी-बियाणे विक्रीची दुकाने.

सोमवार ते शुक्रवार सुरू राहणारी दुकाने

कपडे, हार्डवेअर, मोबाईल फोन, ज्वेलर्स, इलेक्ट्रिक, सलून, ब्युटी पार्लर, स्टेशनरी, टाईल्स, मार्बल्स, वाहन दुरुस्ती व सुटे भाग विक्री, फेब्रिकेशन, संगणक विक्री, कूलर विक्री.

हे बंदच

मॉल, शॉपिंग सेंटर, सिनेमागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, उद्याने, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, क्रीडा संकुल, जलतरण.

पार्सल व होम डिलिवरी

मद्य तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंदच राहणार आहे. परंतु येथून पार्सल तसेच होम डिलिवरीची सुविधा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

नागपुरात निर्बंध शिथिल! सर्व दुकानांची वेळ सकाळी ७ ते २
'मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या'

लग्न, समारंभांवर निर्बंध कायम

सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलनावर निर्बंध कायम आहे. याशिवाय लग्न, सार्वजनिक समारंभांवर निर्बंध आहेत.

(know about new rules of lockdown in Nagpur from 1st june)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com