Nagpur News: अपघातांचा ‘डेंजर चौक’ विकासाच्या प्रतीक्षेत; बंगला चौकाचे रुंदीकरण, सुशोभीकरचा प्रश्न रखडला

Bangla Chowk: A Danger Zone for Over Two Decades: कोदामेंढी येथील बंगला चौक अपघातांसाठी ‘डेंजर चौक’ बनला आहे. मागील वीस वर्षांत शेकडो अपघात, २०-२५ मृत्यू, अनेक जखमी.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

कोदामेंढी (ता. मौदा, जि. नागपूर) : रामटेक, भंडारा तसेच धानला-कोदामेंढी महामार्गाला जोडणारा कोदामेंढी येथील ‘बंगला चौक’ आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. सुसाट धावणारी वाहतूक आणि वाढती वर्दळ यामुळे गेल्या वीस वर्षांत या चौकात शेकडो अपघात झाले असून, २० ते २५ जणांचा बळी गेला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. तरीही चौकाचे रुंदीकरण, सुशोभीकरण आणि सुरक्षाविषयक उपाययोजना रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com