

Nagpur News:
esakal
नागपूर: कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात १६२ फूट उंचीच्या भव्य हनुमान मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या जून महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या संकुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.
या भव्य मूर्तीमुळे कोराडी पर्यटन आणि कौशल्य विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपास येईल, अशी माहिती महसूलमंत्री आणि संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.