esakal | nagpur : कोराडी श्री महालक्ष्मी मंदिर सात ऑक्टोबरला उघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

कोराडी श्री महालक्ष्मी मंदिर सात ऑक्टोबरला उघडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे संचालित महालक्ष्मी मंदिर सात ऑक्टोबरपासून आश्विन नवरात्र महोत्सव -२१‘ भाविकांकरीता उघडण्यात येणार आहे. संस्थानचे अध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त परिसराची पाहणी करून आढावा घेतला. संस्थानच्या प्रशासनाला तयारी लागण्याचे निर्देशही दिलेत. कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. भाविकांना मास्क सक्तीचे असून सॅनिटाईजरच्या वापरानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य आहे.

‘मनोकामना अखंड ज्योति‘च्या दर्शनाकरिता २१०० रुपयाची पास राहणार आहे. या पासवर कुटुंबातील पासधारकासह चार सदस्यांना नवरात्रामध्ये एक दिवस मातेचे दर्शन घेता येईल. त्याचप्रमाणे भाविकांकरीता ५०० रुपयाची विशेष पास एका दिवसांकरिता उपलब्ध राहील. इतर भाविकांकरीता सुद्धा दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. अखंड ज्योत, विशेष दर्शन पास, भाविक पास व व्हीव्हीआयपी करिता वेग-वेगळ्या प्रवेशद्वाराची व्यवस्था केली आहे.

कायदा व सुव्यवस्थेकरीता संपूर्ण मंदिर परिसर पोलिसांच्या नियंत्रणाखाली राहील. मंदिर परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहील. कोविड परिस्थिती लक्षात घेता मंदिर परिसरात दुकाने लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अपंग भाविकांकरीता आठ ई-रिक्षा, व्हील चेअरची व्यवस्था केली आहे. स्थानिक कोराडी ग्रा.पं. कडून शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील मोकळ्या जागेत चार चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केली आहे.

कोराडी ग्राम पंचायतीकडून भाविकांकरीता रुग्णवाहिका उपलब्ध राहील. सभेला उपाध्यक्ष नंदुबाबु बजाज, सचिव दत्तु समरीतकर, सहसचिव प्रभा निमोने, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री, विश्‍वस्त अँड. मुकेश शर्मा, अशोक खानोरकर, प्रेमलाल पटेल, केशवराव फुलझेले, बाबूराव भोयर, अजय विजयवर्गी, लक्ष्मीकांत तडस्कर, कोराडी सरपंच, नरेंद्र धानोले, उपसरपंच आशिष राऊत उपस्थित होते.

loading image
go to top