Nagpur News: नागपूर येथील कुही येथे तरुणाने पुलावरून उडी मारून संपवल जीवन
Nagpur Crime: कुही तालुक्यातील आंभोरा पुलावरून २५ वर्षीय तरुणाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अड्याळ पोलिसांकडून नदीपात्रात शोधकार्य सुरू असून आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कुही : तालुक्यातील आंभोरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून परसोडी येथील २५ वर्षीय तरुणाने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.