

Kuhi Farmhouse Incident
esakal
साळवा (ता. कुही) : तालुक्यातील बारसिंगे फार्म हाऊस येथे पार्टीदरम्यान जलतरण तलावात उंचावरून सूर मारताना डोके तळाशी आदळल्याने रेल्वे पोलिस दलातील जवान सचिन आवारी यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २९) मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.
कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा तपास सुरू आहे. सचिन आवारी हे रेल्वे पोलिस दलातील अन्य सात जवानांसह बारसिंगे फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. घटनेच्या सुमारे अर्धा तास आधी त्यांनी पत्नीशी भ्रमणध्वनीवरून व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल केला होता.
त्यानंतर पार्टीदरम्यान त्यांनी जलतरण तलावात उंचावरून सूर मारला. तलावाची खोली सुमारे साडेचार फूट असल्याने त्यांचे डोके तळातील फरशीवर आदळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रेल्वे पोलिसाचा जलतरण तलावात संशयास्पद मृत्यू बराच वेळ ते बाहेर न आल्याने मित्रांनी शोध घेतला असता त्यांना बाहेर काढण्यात आले. कुही पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल येथे पाठविण्यात आला. कुही पोलिस पुढील तपास करत आहेत.
अकस्मात मृत्यूची नोंद रात्री दिडच्या सुमारास पार्टी दरम्यान सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात सचिन आवारी हे जलतरण तलावात सुर मारत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान आवारी यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातही मृत्यूच्या कारणात मज्जातंतूला गंभीर दुखापत असा उल्लेख करण्यात आला आहे. कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.