नागपूर: भंडारा-तुमसर मार्गावर खापा येथे नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या वाहनाला अपघात झाला. सुदैवाने त्या आणि गाडीत असलेले इतर सहप्रवासी थोडक्यात बचावले. बुधवारी (ता. १) दुपारी हा अपघात घडला. .कुंदा राऊत या भंडारा जिल्ह्याच्या प्रभारी आहेत. पक्षाच्या संघटन सृजन अभियानासाठी भंडारा-तुमसर येथे गेल्या होत्या. त्या आपल्या सहकाऱ्यांसह परत येत असताना तुमसर तालुक्यातील खापा येथे त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले..Nagpur News:आवास योजनेच्या बहाण्याने बॅंकेतून लाखोंचे व्यवहार; सायबर चोरट्यांचा प्रताप ; हुडकेश्वर पोलिसांकडून चौघांना अटक.या वेळी वाहनात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक संगीता बेनिवाल, स्वीय सहाय्यक उपस्थित होते..अपघाताची तीव्रता मोठी असली तरी सुदैवाने सर्वजण बचावले. मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले..Premium|Studyroom: आर्य समाज, ‘सत्यार्थ प्रकाश’ आणि अंधश्रद्धेविरोधी लढा; दयानंद सरस्वतींच्या जीवनकार्याचा वैचारिक वारसा.संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.