esakal | 'कुणी घर देता का घर', प्रख्यात कवी अनिल कांबळेंची आर्त हाक
sakal

बोलून बातमी शोधा

washim

'कुणी घर देता का घर', प्रख्यात कवी अनिल कांबळेंची आर्त हाक

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम : मित्रा पोर्णिमेचा चंद्र तुझा तुला लखलाभ असू दे

माझ्या झोपडीच्या कोनाड्यात अमावशा केव्हाचीच बसली रूसून!

या कवितेने केलेला व्यवस्थेवरचा प्रहार आणि रोजच्या जगण्यातील जळजळीत वास्तव मांडलय कवी अनिल कांबळे यांनी. त्यांच्या ‘झोपडी नंबर १२’ या कविता संग्रहाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार जरी मिळाले असले तरी, त्यांची स्वत:ची झोपडी आता जर्जर झाली आहे. कवी अनिल कांबळे आपल्या झोपडीच्या डागडुजीला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, पदरी निराशेशिवाय काहीच पडत नाही. हे वास्तव आहे.

हेही वाचा: BLOG : कोरोना, मंदिर आणि राजकारण!

वाशीम तालुक्यातील पार्डीटकमोर येथील कवी अनिल कांबळे यांची नामांतराच्या लढ्याच्या मुशीत जडणघडण झाली. घरावर तुळशीपत्र ठेवून चळवळी लढवल्या. अनेकांचे इमले गदागदा हलवून सोडले. चळवळी राजकीय पक्षांच्या बटीक झाल्यानंतर मनातील अन्यायाविरोधातील विद्रोह कवितेच्या रूपाने कागदावर लाव्हा रसागत पसरला. १९८५ साली सरकारने आखलेल्या गावकुसाबाहेर १० बाय १० ची कवेलूची झोपडी या विद्रोहाची साक्षीदार ठरली. या चार ओळीतच आख्खं आयुष्य गेलेल्या कवी अनिल कांबळेच्या झोपडीनेही कधीचाच विद्रोह पुकारला आहे. ग्रंथसंपदा, पुरस्काराची रीळ, नियत-अनियतकालीकाचे गठ्ठे दररोज पावसाने ओलेचिंब होत आहेत. ही झोपडी दुरूस्त व्हावी किंवा विशेष घटक योजनेतून एखादे घरकुल तरी, मंजूर व्हावे यासाठी कांबळे दररोज सरकार दरबारी पायपीट करतात मात्र, व्यवस्थेला पान्हा फुटतच नाही. व्यवस्था वांझ झाली की, आपण निगरगट्ट झालो ? असा प्रश्न हा विद्रोही कवी दररोज स्व:तलाच विचारतोय.

loading image
go to top