
लाखनी (जि. भंडारा) : प्रत्येकाला आरोग्यसेवा मिळावी या दृष्टीने शासनाने आरोग्यविषयक धोरण आखले. मात्र, लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे व शासनाच्या दुजाभावामुळे अजूनही शेवटचा घटक आरोग्यसेवेपासून वंचित आहे. असाच प्रकार लाखनी ग्रामीण रुग्णालयात अनुभवास मिळतो. येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असून, उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा आहे.