नागपूरात वीस वर्षात १५ छोटे तलाव गायब!

२० वर्षात शहरातील चित्र एवढे बदलले की, अतिक्रमणाने जवळपास १२ ते १५ छोटे तलाव नष्ट झाले आहे.
Lake
LakeSakal

नागपूर : दिवसेंदिवस वाढत्या क्षेत्रफळाने गेल्या काही दशकात शहराचा आकार बदललेला आहे. या २० वर्षात शहरातील चित्र एवढे बदलले की, अतिक्रमणाने जवळपास १२ ते १५ छोटे तलाव (Lake) नष्ट झाले आहे. मात्र, शहरातील पर्यावरण अभ्यासकांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. (Nagpur Marathi News)

गेल्या २० वर्षात जवळपास छोटे तलाव कसे नष्ट झाले? याबाबत ‘गुगल अर्थ प्रो’वर स्पष्ट दिसून येत आहे. यात शहरातील २० वर्षा आधी असलेले तलाव आणि आता त्यावर झालेले अतिक्रमण याची स्पष्टपणे दिसत आहे. शहरीकरणासह बिल्डर लॉबी, प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने तलावावर अतिक्रमण झाल्याचे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत बेजबाबदारी भोवली असून वारसा हळूहळू नष्ट होत आहे. गोरेवाडा, अंबाझरी काही प्रमाणात फुटाळा आणि शुक्रवारी असे मोठे तलावच उरले आहे. या तलावांच्या संवर्धनाची खरी गरज असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Lake
पुणे : नवीन कोरोना रुग्णांचा आकडा गुरुवारी तीनशेच्या घरात

सद्यस्थितीतील तलावांची स्थिती

लेंडी, नाईक आणि आणखी एक छोटा तलाव २० वर्षापूर्वी होते. आता एक तलावच अतिक्रमणाने नष्ट झाला आहे. याचा स्पष्ट पुरावा गुगल अर्थवरून मिळत आहे. लेंडी आणि नाईक तलाव फक्त डबके म्हणून उरले असून ते अतिक्रमणाच्या मार्गावर आहे.

वाडी भागात २००० साली ४ छोटे तलाव जवळजवळ होते. त्यावर माती टाकून बुजविल्यानंतर आता वस्ती निर्माण झाली. ३ तलाव नष्ट झाल्याचे नकाशात दिसत आहे. या तलावापासून अंबाझरी पर्यंत वाहणारे प्रवाह सुद्धा नष्ट झाले आहे. पांढराबोडी तलाव नकाशातून गायब झाला आहे. फ्रेंड्स कॉलनी परिसरात ३ छोटे तलाव होते. ते सुद्धा अतिक्रमणाने नकाशातून गायब झाले आहे.

विस वर्षात १५ छोटे तलाव गायब!

रहाटे कॉलनी ते कारागृहात भागात २००० साली दिसणारे २ छोटे तलाव २०१९ मध्ये नष्ट झाले. पूर्व नागपूरातून वळणावळणाने वाहणाऱ्या नागनदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे बदलला.

हिंगणा भागात असलेले ३ छोटे तलाव २००२ साली स्पष्ट दिसत आहे. माती टाकून बुजविल्याने २०१९ साली नकाशातून तलाव गायब झाले आहे.

हीच परिस्थिती सोनेगांव, सक्करदरा, पोलिस लाईन टाकळी, पारडी, गांधीबाग, कोराडी भागात असलेल्या आणि इतर छोट्या तलावांची झाली आहे.

Lake
सराईत गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर येरवड्यात हल्ला

गेल्या २० वर्षात जवळपास १२-१५ छोटे तलाव अतिक्रमणामुळे नष्ट झाले आहे. आपण हळूहळू नैसर्गिक वारसा नष्ट करीत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील जमिनीचा स्तर खाली जाईल.

- अनुसया काळे-छाबराणी, पर्यावरण अभ्यासक

नैसर्गिक संपत्तीची सर्रास लुट सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत कमी झाले. जे शहरातील ३-४ मोठे तलाव वाचले आहेत. त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.

- शरद पालीवाल, पर्यावरण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com