इतिहासातील सर्वांत मोठी वीज दरवाढ महाविकास आघाडीने केली - चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule
इतिहासातील सर्वांत मोठी वीज दरवाढ महाविकास आघाडीने केली - चंद्रशेखर बावनकुळे

इतिहासातील सर्वांत मोठी वीज दरवाढ महाविकास आघाडीने केली - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर - महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) तब्बल १३ टक्के वीज दरवाढ (Eletricity Rate Hike) सर्वसामान्यांवर लादली असल्याची आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी केला. ही दरवाढ राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दरवाढ असल्याचे ते म्हणाले.

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात महावितरण, महापारेषण आणि महाजेनको विद्युत निर्मिती प्रकल्पांना झालेला अधिकचा खर्च भरून काढण्यासाठी ऊर्जा खात्याने ही दरवाढ केली आहे. राज्याचे ऊर्जा मंत्रालय हा अधिकचा खर्च सर्वसामान्यांच्या वीज बिलातून वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे.

राज्यात औद्योगिक क्षेत्रात २५ टक्के आणि घरगुती वीज ग्राहकांना १५ टक्के प्रति युनिट वीज दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.

आता ऊर्जा मंत्रालयाचे कुठलेही कोळसा नियोजन नाही. तीन महिन्यांपासून कोळसा वितरण कंपन्या महावितरणशी संपर्क साधून साठवणूक करण्याचा सल्ला देत होत्या, परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. आता आपत्कालीन स्थिती उद्भवल्यानंतर जादाचे पैसे भरून वीज विकत घ्यावी लागत आहे. याचा भुर्दंड सामान्यांना द्यावा लागतो हे दुर्दैवी असल्याचे सांगताना खर्चाची तरतूद महसूल विभागाकडून करवून घ्यावी आणि सर्वसामान्यांचा भार हलका करावा अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

Web Title: Largest Electricity Rate Hike In History Carried Out By Mahavikas Aghadi Chandrashekhar Bawankule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..