Nagpur News : तलावावर फोटो काढणे जीवावर बेतले; युवकाचा मृत्यू, पाच मित्रांविरोधात गुन्हा दाखल

१६ ऑगस्ट रोजी नयनच्या आईने मुलगा हरविल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
last pictures on the lake one drowning death case registered against five friends
last pictures on the lake one drowning death case registered against five friendssakal

चिमूर : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी फोटो शुट करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचे प्रेत शिवापूर बंदर येथील गिट्टी खदान तलावात आढळून आले.याप्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच्या पाच मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यातील चार अल्पवयीन आहे. त्यांना गुरुवारी बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले, तर आरोपी संकेत रामटेके याला दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. मृत युवकाचे नाव नयन रवी गजभे (वय १९) असे आहे.

येथील नयन रवि गजभे हा १५ आगष्टला बाहेर फोटो शुट करायला जातो म्हणून घरून निघाला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी नयनचा शोध घेतला. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही.

त्यामुळे १६ ऑगस्ट रोजी नयनच्या आईने मुलगा हरविल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. नयनबाबत एका अत्पवयीन मुलाकडे चौकशी करण्यात आली. त्याने आम्ही शिवापूर बंदर येथील गिट्टी खदान तलावात पोहायला गेलो होतो असे त्याने सांगितले.

तेथे जाऊन पोलिसांनी शोध घेतला. याच तलावात नयनचे प्रेत आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. मृत नयनचे कपडे, जोडे कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे त्याला मारण्यात आल्याचा संशय आईने व्यक्त केला.

तशी तक्रार आईने २२ ऑगस्ट रोजी पोलिसांत केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. नयन हा चार अल्पवयीन मुले, संकेत रामटेके यांच्यासोबत शिवापूर बंदर येथील गिट्टी खदान तलावावर गेला. तिथे फोटो काढत असताना नयनचा बुडून मृत्यू झाला.

त्यामुळे घाबरून नयनच्या मित्रांनी त्याचे कपडे आणि जोडे जाळून टाकले. चार अल्पवयीन मुलांसह संकेत रामटेके याला पोलिसांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज गभणे, महिला पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम, पोलिस अंमलदार कैलास अलाम, सतीश झिलपे, भरत घोडवे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com