नरखेड : मालवाहु बोलेरोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

बसस्टापवर उभी असलेली मोटारसायकलचा पण चुराडा
 road accident
road accident Sakal

नरखेड : तालुक्यातील मेंढला बसस्टाप वर वेगात आलेल्या मालवाहु बोलेरोने पिण्याचे पाणी हंन्डपंप वरून घेऊन जाणार्या महिलेला उडवित रोडलगत उभ्या असलेल्या मोटरसायकलचा चुराडा केला असुन पानटपरी चालक सुध्दा थोडक्यात बचावला आहे तर पानटपरी चे नुकसान झाले आहे ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस स्टेशन अर्तगत मेंढला येथे गुरूवारी दि-07 रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली.

देवकाबाई रामकृष्ण अलोणे वय 77 वर्ष राहणार मेंढला असे मृत महिलेचे नाव आहे मेंढला येथील बसस्टाप वर अमीत लाडे यांचे पंक्चर च्या दुकानाला लागुन सावजनिक हंन्डपंप आहे देवकाबाई या हंन्डपंप वरून एकही दिवस न चुकता पाणी नेत होती गुरुवारी सुध्दा ति पाणी भरत असतांना मेंढला फाट्याकडुन मेंढला गावाच्या दिशेने वेगात येत असलेल्या एम एच 40 बी एल 9406 या कमाकाच्या मालवाहु बोलेरोने देवकाबाई रामकृष्ण अलोणे या महिलेला जोरधार धडक दिली त्यांनतर त्याच बोलेरोने रोडच्या बाजुला पानटपरी जवळ उभ्या असलेल्या मोटरसायकल धडक दिली.

ही मोटरसायकल रिंकू अशोक हाके रा.मेंढला याच्या मालकिची असून एम एच 40 सी जी 0175 कमाकाच्या मोटरसायकलला धडक देत मोटरसायकलचा चुराडा केला. अपघात होताच देवकाबाई रामकृष्ण अलोणे वय 77 ईला जखमी अवस्थेत मेंढला पाथमिक आरोग्य केदात नेले असता तिथे वैधकीय अधिकारी मिथुन घोलपे यांनी तपासुन तिला मृत घोषीत केले माहिती मिळताच जलालखेडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार मनोज चौधरी यांनी घटनास्थळ गाठुन मृतदेह ताब्यात घेऊन.

उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा पाथमिक आरोग्य केंदात नेला तर या अपघातात मोटरसायकल मालक रिंकू हाके याच्या दुचाकीसह चंदशेखर(पिंन्टु) वाडबुदे यांच्या पानटपरीचेही खुप नुकसान झाले आहे यापकरणी जलालखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज चौधरी यांनी वाहनचालक गजानन भाऊराव चरपे वय 32, रा.मेंढला यांच्या विरोधात गून्हा नोंदवून त्याला ताब्यात घेत वाहन जप्त केले आहे तर या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मागदशनाखाली मेंढला बिट जमादार पुरूष्षोत्तम धोंडे करीत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com