esakal | शहरातील वकिलांचा वकील संघटनांवरच रोष; लसीकरण शिबिर आयोजित न केल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील वकिलांचा वकील संघटनांवरच रोष; लसीकरण शिबिर आयोजित न केल्याचा आरोप

शहरातील वकिलांचा वकील संघटनांवरच रोष; लसीकरण शिबिर आयोजित न केल्याचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वकिलांना (Lawyers) मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना (Corona) आजाराने ग्रासले आहे. महिन्याभरात सुमारे वीस पेक्षा जास्त वकिलांनी आपला जीव गमावला असून यामध्ये तरुण वकिलांची संख्या देखील तितकीच आहे. वकिलांवर उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे वकील संघटनांवर रोष व्यक्त केला जातो आहे. (Lawyers are angry on Lawyers Firms in Nagpur)

हेही वाचा: दहावीच्या विद्यार्थिनीवर वर्गमित्राने केला अत्याचार; नागपुरात गुन्हा दाखल

न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत सुरु राहावी, प्रत्येक नागरिकांना न्याय मिळावा म्हणून न्यायालयीन प्रशासनाने काही नियमांसह कामकाज सुरू ठेवले आहे. त्याला वकिलांनी हातभार लावत नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पुढे नेले. पहिल्या लाटेमध्ये हे कार्य क्षमले. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये विधि क्षेत्रातील या कोरोना योद्धयांना मोठा फटका बसायला सुरवात झाली.

परिणामी अवघ्या महिन्याभरामध्ये वीस पेक्षा जास्त वकिलांना आपले प्राण गमवावे लागले. आपले सहकारी, मित्रांच्या निधनाची बातमी ऐकून वकिलांकडून आता संताप व्यक्त केला जातो आहे. जवळपास बाराही महिने न्यायालयीन कामकाज सुरू असताना वकील संघटनांनी वकिलांच्या लसीकरणासाठी प्रशासनाला आग्रह केला नसल्याचा आरोप करीत रोष व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा: जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावावर माणसांची जत्रा; शहरातील गर्दी कमी होईना

कोरोनाचा राज्यातील ४ हजारांवर वकिलांना फटका बसला आहे. राज्यातील वकिलांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर लसीकरण शिबिराच्या आयोजनासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी शनिवारी (ता. १५) वेळ दिली आहे. जागेच्या उपलब्धतेसह इतर बाबींवर चर्चा होईल.
-ॲड. अनिल गोवरदिपे, अध्यक्ष, बार कॉंन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲंड गोवा

(Lawyers are angry on Lawyers Firms in Nagpur)

loading image
go to top