बावनकुळे यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

भाजपने त्यांचे १०२ नगरसेवक विविध राज्यांमध्ये सहलीला पाठविले आहे
Ravindra Bhoyar and
Chandrashekhar Bawankule
Ravindra Bhoyar and Chandrashekhar BawankuleRavindra Bhoyar and Chandrashekhar Bawankule

नागपूर : विधान परिषद निवडणुकीतील (Legislative Council elections) कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांनी भाजपचे उमेदवार व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगाला पाठविलेल्या पत्रात डॉ. भोयर यांनी बावनकुळे मतदारांना लाच (Alleged bribery) देत असल्याचा आरोप केला आहे.

भाजपने (BJP) नगरसेवकांना कुटुंबासह सहलीला पाठविले आहे. यावरून डॉ. भोयर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे नमुद केले. नगरसेवकांसाठी विमान तिकीट, महागडे हॉटेल्स, खर्च करण्यासाठी बावनकुळे यांनी पैसा उपलब्ध करून दिल्याचा आरोप डॉ. भोयर यांनी केला आहे. बावनकुळे यांच्याविरोधात संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Ravindra Bhoyar and
Chandrashekhar Bawankule
पक्षांतराचे धक्के; काँग्रेसचा नेता राष्ट्रवादीत तर भाजपचा काँग्रेसमध्ये

विधान परिषद निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान (Voting ends December 10) होणार आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) व कॉंग्रेसचे डॉ. रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांच्यात थेट लढत आहे. कॉंग्रेसकडून भाजप नगरसेवकांना आमिष दाखवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता बघता भाजपने त्यांचे १०२ नगरसेवक विविध राज्यांमध्ये सहलीला पाठविले आहे. हे नगरसेवक ९ डिसेंबरला रात्री शहरात येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com