Legislative Council elections : निवडणुकीत बसप राहणार तटस्थ; कोणाला बसणार फटका? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुजन समाजवादी पार्टी

निवडणुकीत बसप राहणार तटस्थ; कोणाला बसणार फटका?

नागपूर : नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महाविकासआघाडीकडून उभे असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. रवींद्र भोयर यांच्यात थेट लढत होणार आहे. निवडणुकीसाठी १० डिसेंबरला (शुक्रवारी) मतदान होणार आहे. मात्र, बहुजन समाजवादी पार्टीने निवडणुकीत तटस्थ (Will not vote) राहण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका कोणाला बसते हेच आता पाहणे बाकी आहे.

विधान परिषदेसाठी भाजपने माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांना उमेदवारी दिली. विधानसभेत त्यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांचे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम सुरू होते. याचेच बक्षीस म्हणून त्यांना उमेदवारी देण्यास आली. दुसरीकडे भाजपमध्ये ३४ वर्ष काम करूनही न्याय मिळाल्याने सांगत डॉ. रवींद्र भोयर (ravindra bhoyar) काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली.

हेही वाचा: तब्बल १५ देशांमध्ये चालते भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्स

यामुळे कट्टर स्वयंसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोयर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. नगरपालिकेत भाजपचे ३३४ नगरसेवक आहेत. तर बहुजन समाजवादी पार्टीचे दहा ते तेरा नगरसेवक आहेत. अशात नागपूर विधान परिषद निवडणुकीत बसपाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या या निर्णयाचा भाजपला कोणताच फरक पडणार नाही, दुसरीकडे काँग्रेसला याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. कारण, पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तिन्ही पक्ष मिळूनही नगरसेवकांची संख्या कमी आहे. अशात बसपने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्यास त्यांना थोडा का होईना फायदा झाला असता. मात्र, त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने डॉ. रवींद्र भोयर यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Legislative Council Elections Bahujan Samajwadi Party Will Not Vote Chandrashekhar Bawankule Ravindra Bhoyar Nagpur Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..