कोण कुणाचा हिशेब चुकता करणार? अफवांच्या बाजाराने संशयकल्लोळ

भोयर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने अफवांचा बाजार चांगलाच गरम झाला आहे
Chandrashekhar Bawankule and Ravindra Bhoyar
Chandrashekhar Bawankule and Ravindra BhoyarChandrashekhar Bawankule and Ravindra Bhoyar

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council elections) आता कुणालाच सोपी राहिलेली नाही. मुळचे भाजप (Bjp) आणि संघ स्वयंसेवक असलेले डॉ. रवींद्र भोयर यांना कॉंग्रेसने (Congress) उमेदवारी दिल्याने अफवांचा बाजार चांगलाच गरम झाला आहे. मात्र, कोण कुणाचा हिशेब चुकता करणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

भोयर यांना भारतीय जनता पक्षानेच कॉंग्रेसच्या गोटात पाठविले, भोयर (Ravindra Bhoyar) भाजप नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी करणार अशा अफवांबरोबरच माजी महापौर संदीप जोशी पदवीधरमध्ये झालेल्या पराभवाचा बावनकुळे यांच्यासोबतच हिशेब चुकता करणार असल्याची जोरदार अफवा सुरू आहे. त्यामुळे चांगलेच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chandrashekhar Bawankule and Ravindra Bhoyar
MPSC स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; कोणत्या दिवशी होणार पेपर वाचा...

विधान परिषदेत भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची थेट लढत रवींद्र भोयर यांच्याशी होत आहे. भाजपच्या त्यांना उपमहापौर केले होते. कार्यकारी महापौर म्हणूनही त्यांनी सहा महिने महापालिकेचा कार्यभार बघितला. नागपूर सुधार प्रन्यासचे ते तीन वर्षे विश्वस्तसुद्धा होते. त्यामुळे ते अचानक काँग्रेसमध्ये जाण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भोयर हे नितीन गडकरी यांचे विश्वासू होते. नागपूर सुधार प्रन्यासवर विश्वस्त म्हणून त्यांनीच भोयर यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे ते भाजप सोडतील असे कोणालाच वाटत नव्हते. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच त्यांनी ती लढण्याचा इरादा जाहीर केला होता. ते उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि शेवटच्या दिवशी माघार घेतील अशीच अटकळ सर्व बांधत होते. भोयर यांचा फटकळ आणि मिस्कील स्वभाव बघता हा दबाबतंत्राचा भाग असावा असेच सर्वांना वाटत होते. मात्र, त्यांनी थेट काँग्रेसची उमेदवारी घेऊन सर्वांनाच धक्का दिला.

सुरुवातीला भोयर एकटे नाहीत असे बोलले जात होते. एक माजी आमदार आणि महापालिकेचा एक माजी पदाधिकारी त्यांच्यासोबत आहे. दहा ते बारा नगरसेवक ते फोडतील, असे दावे केले जात होते. मात्र अद्याप भोयर यांच्या समर्थनार्थ भाजपचा एकही नगरसेवक वा पदाधिकारी उघडपणे समोर आला नाही. ही काँग्रेसची स्टॅटेजी आहे. थेट मतदानाच्या दिवशी भाजपला धक्का बसेल, असे दावे भोयर समर्थक करीत आहेत. भोयर यांच्यावतीने काही भाजपच्या नगरसेवकांना ऑफर देण्यात आल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे हा भाजपचाच गेम प्लॅन आहे. आपला उमेदवार काँग्रेसच्या गोटात धाडला अशा अफवाही पसरल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule and Ravindra Bhoyar
राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसला धोबीपछाड; राजकीय गणितेच बदलली

नाराजी आणि संशयकल्लोळ

संख्याबळ जास्त असल्याने भाजपला धोका नसल्याचे बोलले जात असले तरी ‘भोयर फॅक्टर’चा धसका काही प्रमाणात तरी घेतला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमधूनही नाराजीचे सूर उमटले. महत्वाच्या लढाईत खंदा कार्यकर्ता न मिळणे हे सुध्दा एक प्रकारचे अपयशच असल्याच्या भावना कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत असल्याच्या चर्चाही आहेत. एकुणच ही निवडणूक अफवा आणि संशयकल्लोळाच्या भोवती फिरत असल्याचे दिसून येते. निकाल हाती येईपर्यंत हे थांबण्याची चिन्हे नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com