फोडाफाडीची भीती; काँग्रेसचे उमेदवार जाणार अज्ञान स्थळी

Congress Party
Congress PartyCongress Party

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना कुठे घेऊन जायचे हे ठरत नसल्याने जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच चांगले व सोयीचे ठिकाण सुचवण्याचे अधिकार देण्यात आले आहे. त्यानंतर सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य सोमवारी अज्ञात स्थळी रवाना होणार असल्याचे समजते. विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) फोडाफाडी (Fear of bursting Candidate) होऊ नये यासाठी काँग्रेस (Congress) आणि भाजपचे उमेदवार आधीपासूनच दक्षता घेत आहे. आपल्या मतदारांपर्यंत दुसरा उमेदवार पोहोचू नये यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञान स्थळी पाठवण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या सदस्यांना कुठे न्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थळाबाबत एकमत होत नसल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनाच स्थळ शोधण्यास सांगितले आहे. रविवारी जागा निश्चित झाल्यानंतर सकाळीच सर्व सदस्यांना रवाना केले जाणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ३२ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, शिवसेना एक, एक गोंडवाना, एक शेकाप व एक अपक्ष सदस्य आहेत. या सर्वांचा समावेश महाविकास आघाडीत आहे. भाजपचे १४ सदस्य आहेत. अपक्ष व एक सदस्य असलेल्यांसोबत विरोधक संपर्क साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अशा सर्वांना संपर्क क्षेत्राच्या बाहेर पाठवण्यात येत आहेत.

Congress Party
Sunset बघायला ‘ब्लू बिकिनी’मध्ये समुद्रात गेली अनन्या पांडे

व्हॉट्‍अप कॉलवर संपर्क

आपण कोणाशी संपर्क साधला किंवा कोणाचा कॉल आला याची माहिती इतरांना कळू नये याकरिता काही सदस्य एकमेकांसोबत व्हॉट्‍ॲप कॉलवर संपर्क साधत आहे. व्हॉट्‍सॲपवर कॉलवरून संपर्क साधल्यास त्याची सीडीआर मिळत नाही. आपल्या मोबाईलच्या लिस्टमधून संबंधित नंबर सहज डिलिट करता येतो. त्यामुळे फोन कॉलऐवजी सदस्य एकमेकांसोबत व्हॉट्ॲप कॉलवरून संपर्क साधत आहेत.

कामठीचे सदस्य रवाना

कामठी तालुक्यातील भाजपच्या सर्व मतदारांना सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अनिल निदान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन शनिवारी अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे निदान भाजपचे उमेदवार व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विश्वासातील आहेत. मात्र पोटनिवडणुकीत शेवटपर्यंत त्यांच्या उमेदवारीवर निर्णय भाजपने घेतला नाही. त्यामुळे त्यांना कमळ चिन्ह मिळाले नाही. या कारणामुळे जि.प.च्या पोटनिवडणुकीत निदान पराभूत झालेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com