काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ : उमेदवार बदलणार; देशमुखांना समर्थन?
Mangesh Deshmukh

काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ : उमेदवार बदलणार; देशमुखांना समर्थन?

भोयर यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये मतभेदाची ठिणगी पडली होती

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council elections) मतदानाला अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना काँग्रेसवर अधिकृत उमेदवारच बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना समर्थन जाहीर करावे यासाठी स्थानिक नेत्यांमार्फत दिल्लीकडे परवानगी मागितल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसने विधान परिषदेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांना आयात केले होते. संघाचा माणूस फोडल्याचा मोठा गाजावाजा काँग्रेसने केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भोयर यांची हमी घेतली होती. भोयर यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये मतभेदाची ठिणगी पडली होती. अनेकांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला होता.

काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ : उमेदवार बदलणार; देशमुखांना समर्थन?
‘पहाट’ शपथेचा परिणाम; शिवसेना-काँग्रेस एकाच पंक्तीत

भोयर प्रचार करीत नाहीत, मतदारांच्या आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत नसल्याने ते मॅनेज झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्याची नेते आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी निवडणुकीचे सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. बुधवारी रेडिसन ब्लू त्यानंतर सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे काँग्रेसची बैठक झाली.

यात जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख हे स्वतः उपस्थित होते. त्यामुळे उमेदवार बदलण्यात येणार असल्याच्या चर्चेने आणखीच जोर धरला. सर्वांसोबत चर्चा करून बैठकीत उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळते.

काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ : उमेदवार बदलणार; देशमुखांना समर्थन?
समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसमोर जोडप्याने केले लज्जास्पद कृत्य

काँग्रेसच्या अनेक नेत्यांसोबत संपर्क साधला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, उमेदवार बदलणार नाही असे एकाही नेत्याने ठामपणे सांगितले नाही. दिल्लीला उमेदवार बदलण्याची विनंती केली आहे. सुरुवातीला सात वाजेपर्यंत, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत पत्र येणार आहे. त्यानंतरच उमेदवाराबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्याने सांगितले.

दिल्लीच्या उत्तराची प्रतीक्षा

डॉ. रवींद्र भोयर यांच्याऐवजी मंगेश देशमुख यांना काँग्रेसने समर्थन जाहीर करावे अशी विनंती स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांकडे केली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत मंजुरीचे पत्र येईल याची प्रतीक्षा स्थानिक नेते करीत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत अधिकृत पत्र प्राप्त झाले नव्हते.

मतदारांना संदेश पोहोचवला?

दिल्लीच्या उत्तराची वाट न बघता जिल्ह्यातील नगरसेवक व मतदारांना देशमुख यांना मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर अनेक मतदारांनी सूचना मिळाल्याचे सांगितले. हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे बोलावलेल्या बैठकीला प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ : उमेदवार बदलणार; देशमुखांना समर्थन?
फेसबुक फ्रेंड्सच्या प्रेमापोटी तरुणी निघाली राजस्थानला
माध्यमांमध्ये येणारे वृत्त खोडसाळ आहे. आपण या विरोधात संबंधितावर अवमान याचिका दाखल करणार आहोत. मंगेश देशमुख यांना काँग्रेसला समर्थन जाहीर करण्यासाठी बैठकीला बोलवण्यात आले होते. दिशाभूल करणारी चर्चा घडवून आणण्यामागे भाजपचा हात आहे.
- रवींद्र भोयर, काँग्रेसचे उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com