बिबट्या आला रे आला! पण, वनविभागाचे कर्मचारी पोहोचताच निघाला बोक्या

leopard
leoparde sakal
Updated on

नागपूर : गेल्या तीन दिवसापासून शहरात विविध भागात बिबट्याचे (leopard in nagpur city) दर्शन झाल्याच्या अफवाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बुधवारी (ता.२) रात्री अकरा वाजताच्या दरम्यान सिव्हिल लाइन्समधील कौटुंबीक न्यायालय (family court nagpur) समोरून आयुक्त कार्यालयाकडे बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाने (forest department nagpur) तातडीने परिसरात गस्त करून संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र, काहीही आढळले नाही. अशा विविध अफवा पसरत असताना सांयकाळी आणि रात्रीही अशीच अफवा पसरली. त्याचा मागोवा वन विभागाने घेतला असता एका ठिकाणी लॅब्रेडॉर कुत्रा तर दुसऱ्या ठिकाणी बोक्या निघाला. (leopard not found even after seven days in nagpur)

leopard
थरारक! अधिकाऱ्याचा एक पाय वाघाच्या तोंडात, तर दुसऱ्यावर पंजा; पथकावर केला हल्ला

गेल्या सहा दिवसापासून गायत्री नगरात दिसलेल्या बिबट्याने शहराची भ्रमंती सुरू आहे. गायत्रीनगर आणि परसोडी येथील प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्हीमध्ये दिसल्यानंतर बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही. त्यानंतर महाराजबाग परिसरात डुकराची शिकार केल्यानंतर बिबट त्या परिसरात असल्याचे उघड झाले. त्याशिवाय पायाचे ठसेही आढळले. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. मात्र, हा बिबट्या पिंजऱ्यांच्या जवळही फिरकला नाही. दरम्यान, आज सकाळी पुन्हा आयुक्त कार्यालय, सर्वोच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसरात बिबट असल्याचे माहिती मिळाली. कुत्र्याच्या मदतीने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, काहीही आढळळे नाही.

सायंकाळी सहा वाजता सिव्हिल लाईन्समधील जीपीओजवळ असलेल्या यस बॅंकेच्या जवळ बिबट दिसल्याचे माहिती एका महिलेने दिली. त्यानुसार त्या परिसराचीही पाहणी केली. मात्र, कुठलाही पुरावा आढळून आला नाही. माहिती देणाऱ्या महिलेकडे पुन्हा विचारणा केल्यानंतर तीने दिलेल्या माहिती नुसार त्या परिसरातील नागरिकांची चौकशी केली. त्यांनी या परिसरात एक मोठा कुत्रा घेऊन व्यक्ती त्याच वेळेस फिरत असल्याचे सांगितले. कुत्रा घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीची विचारणा केल्यानंतर तो बिबट नव्हे तर कुत्रा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच शहरातील इतर भागातही बिबट्याच्या अस्तित्वाचे पुरावे दिसले नाहीत. त्यामुळे बिबट्या त्या परिसरात आहे किंवा नाही हे अद्याप कळू शकलेले नसताना रात्री सव्वा आठ वाजता पुन्हा एका व्यक्तीने सिव्हिल लाइन्स परिसरातील एका भिंतीवर बिबट दिसल्याचे सांगितले. त्यांनी सांगितल्यानुसार परिसराची पाहणी केली दरम्यान तो बिबट्या नसून बोक्या निघाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्या सापडत नसल्याने त्रस्त झालेल्या वनविभागाने आता बिबट असल्याची खात्री असल्याशिवाय फोन न करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com