

New Year Party Foiled as Police Seize Huge Liquor Consignment
sakal
वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्ध्यात अवैध दारूची वाहतूक जोरात होते. या वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली तरी मोठ्या प्रमाणात दारूचे पाट वाहतात. हे पाट रोखण्याकरिता पोलिसांकडून दोन दिवसात दारूवाहतुकीवर कारवाई करण्यात आली. दोन दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत २५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.