Solar Energy: एलआयटीची कार्बन झिरोच्या दिशेने झेप; २५० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी
Nagpur News: एलआयटी नागपूर विद्यापीठाने सौरऊर्जेचा वापर करून कार्बन न्यूट्रल कॅम्पसचा मोठा टप्पा गाठला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने उभारलेल्या प्रकल्पामुळे दरवर्षी ३६ लाखांची वीजबचत होणार आहे.
नागपूर : भारतचा २०७० पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचा निर्धार आहे. त्यानुसार एलआयटी विद्यापीठाने कार्बन न्यूट्रल संस्थेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. एलआयटी विद्यापीठाच्या परिसरात सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.