
नागपूर : दुसऱ्याचे आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करून बॅंकेतून वाहन कर्ज काढून फसवणूक केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी सागर श्यामकुमार ठेंगडी (वय ३७, रा. जलालपुरा, गांधीबाग) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बॅंकेच्या फायनान्स एक्झिक्युटिव्हसह युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.