नागपूर विभागाचे साडेसात कोटीचे नुकसान | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

नागपूर विभागाचे साडेसात कोटीचे नुकसान

नागपूर : सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा १५ वा दिवस. कर्मचारीही आता आर्थिक संकटात सापडले आहेत. तर पंधरा दिवसात एसटी महामंडळाचे नागपुर विभागाचे सुमारे साडेसात कोटींचे नुकसान झाले आहे. तरीदेखील कर्मचारी माघारी फिरण्यास तयार नसल्यामुळे शासनाने आता वेळकाढू धोरण सुरू केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आता वाऱ्यावर सोडून दिले असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये तयार होत आहे. यामुळे पुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याच्या भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवल्या.

हेही वाचा: औरंगाबाद : प्रायोगिक तत्त्वावर प्रभाग नऊची जीआय मॅपिंग पूर्ण

पुढाऱ्यांच्या चिथावणीला बळी पडल्याची भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली, मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे आग्रही मत त्यांनी मांडले.

आता विलिनीकरणाशिवाय माघार नाही. यासाठी नागपूर विभागातील आडिच हजार एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारले आहे. यात रोजंदारी कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले. नागपूर विभागातील १४६ कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत निलंबनाची कारवाई झाली. ५७ अस्थायी कर्मचारी कामावर न आल्याने त्यांना सेवासमाप्तीची नोटीस दिली. दर दिवसाला एसटीचे नागपूर सुमारे ४९ लाख उत्पन्न होते. मात्र मागील पंधरा दिवसांपासून हे उत्पन्न बुडत आहे. आतापर्यंत नागपूर विभागाचे साडेसात कोटीचे नुकसान झाले आहे.

loading image
go to top