अपघातात दोन्ही पाय गमावले; पण जिद्द होती कायम, मिळवले हे यश...

Lost both legs in the accident; But perseverance was permanent, success was achieved ...
Lost both legs in the accident; But perseverance was permanent, success was achieved ...
Updated on

नागपूर : आयुष्यात उंच भरारी घेण्याची मोठी स्वप्ने सगळेच बाळगतात. अशरफने तशीच काही स्वप्ने उराशी बाळगली होती. परंतु प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. एके दिवशी काळाने घाला घातला अन्‌ एका क्षणात स्वप्नांचा चुराडा झाला. एका अपघातात अशरफला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. मात्र, त्यातून सावरत अशरफ जिद्दीने उभा राहिला. निव्वळ उभाच राहिला नाही तर त्याने स्वत:ला सिद्धही करून दाखविले.

मूळचे राजस्थान येथील असलेले अशरफ जोया याचे कुटुंब कामासाठी नागपुरात आले. अशरफच्या मोठ्या बहिणीचे 30 जून 2018 रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील डेगाना गावी लग्न ठरलं होते. त्या लग्न कार्यात सहभागी होण्यासाठी अशरफ रेल्वेने डेगाना गावी जात होता. मकराना रेल्वे स्थानकावर तो पाणी पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला. परत ट्रेनमध्ये चढताना त्याचा पाय घसरल्याने तो सरळ रुळावर पडला. तेवढ्यात ट्रेन सुरू झाली आणि पूर्ण ट्रेन त्याच्या पायावरून गेली. या अपघातातून अशरफ बचावला खरा, पण त्याने दोन्ही पाय मांडीपासून गमावले.

अवघ्या सतराव्या वर्षांच्या कोवळ्या वयात अशा प्रकारचा दु:खाचा डोंगर त्याच्यावर कोसळला. कुटुंबासाठी ही मोठी शोकांतिका होती. सुरुवातीला जयपूर येथे त्याच्यावर उपचार झाले. अपघाताच्या धक्‍क्‍यातून कसाबसा सावरत तो नागपुरात कुटुंबासह परतला. त्याला प्रोस्थेटिक पाय दिले गेले आहेत. त्यामुळे तो मर्यादित हालचाली व्यवस्थापित करू शकतो. मात्र, या घटनेतून खचून ना जाता अशरफने परिस्थितीशी दोन हात करण्याचे ठरविले. त्याने आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करीत, मोठ्या हिमतीने परीक्षा दिली आणि बारावीच्या परीक्षेत तब्बल 93.07 टक्‍क्‍यांसह यश मिळवीत दिव्यांग श्रेणीतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. भावी आयुष्यात अशरफला प्रशासकीय सेवेत किंवा व्यवस्थापन क्षेत्रात करियर करण्याची इच्छा आहे.


कुटुंब झाले आधार
अपघातानंतर अशरफला मानसिक आधार देण्याचे काम कुटुंबीयांनी केले. त्याच्यासाठी सर्वात मोठा आधार म्हणजे त्यांची मोठी बहीण जरिना. सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गणित विभागातून एम.एसस्सी अभ्यासक्रमात शिकत आहे. तीसुद्धा नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून बीएसस्सी मॅथ्समध्ये टॉपर असून, तिने सुवर्णपदक व व इतर पदके मिळविली आहे. आतापर्यंतच्या या कठीण प्रवासात ती अशरफसोबत ताकदीने उभे राहून त्याचा आधारस्तंभ ठरली आहे. त्याला रोजच्या नित्यक्रमामध्ये जरीन त्याला शिकवणी वर्गातून ने-आण करणे आणि अभ्यासात मदत करते. अशरफबाबत तीची असलेली तळमळ वाखाण्याजोगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com