लग्नासाठी प्रियकराने दिला मनस्ताप

प्रेयसीचा आरोप : चर्चेसाठी घरी बोलावून केला अत्याचार
 मुलांचे शोषण
मुलांचे शोषणsakal

अमरावती : २०१५ पासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. एकदा नव्हे, तर दोन-तीन वेळा लग्नाचे आमिष दाखविले; परंतु ऐनवेळी लग्नास नकार दिला. त्यामुळे युवतीला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

मंगेश प्रदीपराव पारशिवेकर (वय ३३), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खल्लार पोलिसांनी सोमवारी (ता. ३१) संशयित मंगेशविरुद्ध कारवाई केली. त्याच्याविरुद्ध प्रेयसीच्या तक्रारीवरून दाखल झालेला हा अत्याचाराचा दुसरा गुन्हा आहे. पहिला गुन्हा मंगेशविरुद्ध आयुक्तालयातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

 मुलांचे शोषण
हिंगोली : ट्रक, आयशर टेम्पोच्या समोरा समोर धडकेत तीन ठार

२०१३ ते २०१५ या कालावधीत पीडित युवती व संशयित मंगेश पारशिवकर हे दोघे मोबाईलवरून संपर्कात होते. २०१५ मध्ये युवतीला मंगेशने ती आवडत असल्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. डिसेंबर २०१५ मध्ये मंगेशने असे आमिष दाखवून बळजबरीने अत्याचार केला, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला. लग्न करण्याच्या अटीवर नागपूर उच्च न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पीडितेने प्रकरण मागे घेतले. त्यानंतर वारंवार पीडितेने लग्नासंदर्भात मंगेशकडे विचारणा केली असता संशयित मंगेशने वेगळाच पवित्रा घेतला.

त्याच्याकडे असलेले दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी तिला त्याने दिली. काही दिवसांपूर्वी पुन्हा संशयित मंगेशने पीडितेला लग्नाची चर्चा करण्यासाठी त्याच्या घरी बोलावून घेतले अन् पुन्हा अत्याचार केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ३० जानेवारी २०२२ रोजी पीडिता आपल्या नातेवइकासोबत आरोपीच्या घरी गेली असता त्याने व त्याच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करून हाकलून लावले, असा आरोप आहे. या प्रकरणात सहकार्य करणाऱ्या एका महिलेविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com