अल्प गुंतवणूकीतून घेतली व्यावसायिक भरारी!

Swati Gokhale
Swati GokhaleSwati Gokhale

नागपूर : जिद्द, चिकाटी आणि व्यवसाय करण्याची उर्मी असेल तर अल्प भांडवलातही उत्तम व्यवसाय उभारून मोठी प्रगती साधता येऊ शकते. देवनगर येथील महिला उद्योजक स्वाती गोखले यांनी ते सिद्ध करून दाखविले. अवघ्या ३० हजारांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या गोखले उद्योगाने अल्पावधीतच गरुडझेप घेत लाखोंचा पल्ला गाठला आहे. त्यांचे हे काम स्वयंरोजगार करण्यास इच्छुक अनेक गृहिणींसाठी प्रेरणादायी व नवी दिशा दाखविणारे आहे.

साधारण चार-पाच वर्षांपूर्वी सर्वसामान्य महिलांप्रमाणे स्वातीही घरगुती कामे करायच्या. खासगी नोकरी करणाऱ्या पतीच्या (अनिल गोखले) कमाईत खुश होत्या. मात्र, घरी बसण्यापेक्षा एखादा उद्योग करून आपणही चार-दोन पैसे कमवावे, असा एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला. पतीने सपोर्ट केला आणि स्वातीने घरगुती प्रॉडक्ट्स तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.

प्रारंभी १८ धान्यांचा समावेश असलेली प्रोटिनयुक्त हेल्दी व पौष्टिक थालीपीठ भाजणी त्या ऑर्डरनुसार घरोघरी विकू लागल्या. हे काम करीत असतानाच एकेदिवशी त्यांची भेट जोग कॅटरर्सचे नरेंद्र जोग यांच्याशी झाली. त्यांनी स्वाती यांना मोठा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले. तेथूनच गोखले उद्योगाची सुरुवात झाली.

Swati Gokhale
दोन मुलांसह तुला स्वीकारतो; फक्त माझ्याशी लग्न कर, अन्...

५० वर्षीय स्वाती यांनी केवळ ३० हजारांची अल्प गुंतवणूक करून २०१७ मध्ये देवनगर येथे घराच्याच बाजूला छोटेसे दुकान थाटले. दोन गिरण्या खरेदी केल्या. सोबतीला बेरोजगार महिलांची मदत घेतली. दर्जेदार फ्रेश प्रॉडक्ट्स व तत्पर घरगुती सेवेमुळे हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला. ‘घरचे खाऊ मजेत राहू’ असे ब्रीदवाक्य असलेल्या गोखले उद्योगाचे आजच्या घडीला विविध प्रकारची ३० पेक्षा अधिक उत्पादने आहेत.

यामध्ये धान्याचे पीठ, उपवासाची भाजणी, मेतकूट, मुखवास, सातूचे पीठ, इडली पीठ, डोसा पीठ यासह घरगुती बनवलेला चिवडा, चकल्या, लाडू, करंजी, पुरण इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय यवतमाळच्या ४८ वर्षे जुन्या प्रसिद्ध रानडे यांच्या बेकरीचे श्रीखंड, आम्रखंड, लोणी, पनीर, टोस्ट, कुकीज, गोरस पाक हे प्रॉडक्ट्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिवाळीसारख्या सणांमधील खाद्यपदार्थांचीही घरपोच सेवा सुरू असते. कोरोनाचा काळ असूनही त्यांनी वर्षभरात १५ लाखांची विक्री केली, हे उल्लेखनीय.

Swati Gokhale
१५ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; प्रियकराविरुद्ध गुन्हा

गोखले उद्योगाच्या माध्यमातून स्वाती यांनी स्वतःची प्रगती तर साधलीच, शिवाय अनेक गोरगरीब व गरजू महिलांनाही रोजगार मिळवून दिला आहे. मेहनतीची तयारी आणि घरच्यांचा पुरेपूर सपोर्ट असेल तर एक महिला कशी प्रगती साधू शकते, हे यानिमित्ताने स्वाती यांनी जगाला दाखवून दिले. त्यांचा हा उद्योग समाजातील अन्य महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

घरी बसण्यापेक्षा आयुष्यात काहीतरी करायचे, या उद्देशाने चार-पाच वर्षांपूर्वी घराबाहेर पडले. पतीची साथ मिळाली आणि योग्यवेळी जोग सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे व्यवसाय वाढत गेला; प्रगती होत गेली. आतापर्यंतच्या प्रगतीवर खुश आहे. व्यवसायाची गाडी सध्या योग्य दिशेने धावत असून, भविष्यात आणखी व्यवसायाचा चौफेर विस्तार करण्याचा मानस आहे.
- स्वाती गोखले, महिला उद्योजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com