Nagpur Mahal : महाल नागपूर शहराचे मन, हृदय आणि आत्मा
Historical Place : महाल हे नागपूर शहराचे हृदय असून, त्याचा इतिहास, संस्कृती आणि ओळख अजरामर आहे. ही फक्त जागा नसून नागपूरकरांच्या भावना आणि आत्म्याचा एक भाग आहे.
नागपूर : महाल हे फक्त जागेचे नाव नाही तर शहराचे मन, हृदय आणि आत्मा आहे. महाल ही शहराची शान होती, आहे आणि यापुढच्या काळातही राहणार. त्यामुळेच म-हा-ल ही निव्वळ सुटी अक्षरे नसून ती प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या कुप्पीत अत्तर लावून ठेवावी, अशी भावना आहे.