Bamboo Farming : बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाढवलेले उत्पन्न; २०२५ मध्ये ६३ लाख बांबू रोपे लागवडीला
Farmers Income : महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी थेट अनुदान देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे आणि पर्यावरणालाही फायदा होईल.
नागपूर : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ शेतजमिनींवर बांबू लागवडीपासून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन झाले आहे. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळाला आहे.