
मुंबई : विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामधे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) नवेगाव बांध पर्यटक निवास नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्पाच्या भोवती शाश्वतरीत्या उभारले असून ते पर्यटकांसाठी पर्वनी ठरेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मंत्रालय येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर या पर्यटन निवासाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी आभासी पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.