esakal | 'केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन'
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

'केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाचा (union cabinet expansion) नुकताच विस्तार झाला आहे. यामध्ये ४३ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रिपद मिळाले आहे. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन दिलंय. ज्यांनी देश बुडवला त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिला असल्याचा घणाघात त्यांनी केला. (maharashtra congress president nana patole criticized bjp on cabinet expansion)

हेही वाचा: गडकरींचं 'MSME' खातं नारायण राणेंना का दिलं?

गॅस, पेट्रोल, डिझेल आणि इतर महागाईविरोधात आजपासून काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन करण्यात आलं. आजपासून या आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानिमित्त नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलते.

कोरोनाची स्थिती हाताळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपयश आलं आहे. यामध्ये मोदींनीच राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला. त्यांना राजीनामा घेण्याची गरज नव्हती. नारायण राणे यांना मंत्री केलं काय किंवा आणखी कुणाला. मात्र, सर्व मंत्रालय पीएमओ मधून चालतंय. नवीन मंत्री झाले त्यांना लवकरंच ही बाब कळेल, असेही पटोले म्हणाले.

लोकांना भिती निर्माण करुन राजकीय पोळ्या शेकण्याचं काम भाजप करत आहे. खडसेंसारखे नोटीस येणं ही आता नवीन बाब नाही. यामुळे ईडी सिबीआयचा धाक संपेल. मोदी यांनी देशाला बरबाद करणार करणारी व्यवस्था आणली, असाही निशाणा पटोले यांनी साधला.

loading image