Kharif Crop Loss: खरीप हातचा गेला; रब्बीचाही भरोसा नाही ;दुष्काळ जाहीर, मात्र मदतीची प्रतीक्षा

Drought in Maharashtra: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर जमिनीत ओलावा नसल्याने गहू आणि हरभऱ्याच्या पेरणीचा प्रश्न निर्माण झाला असून, दुष्काळ जाहीर होऊनही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
Drought-hit farmers in Samudrapur taluka of Wardha district face Kharif crop losses and uncertainty over Rabi sowing due to a lack of soil moisture.

Drought-hit farmers in Samudrapur taluka of Wardha district face Kharif crop losses and uncertainty over Rabi sowing due to a lack of soil moisture.

esakal

Updated on: 

समुद्रपूर : पावसाने पाठ फिरवल्याने समुद्रपूर तालुक्यातील खरीप पिके हातची गेली असून, जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. सोयाबीन शेंगा भरण्यापूर्वीच वाळले, तर कपाशीची वाढ खुंटून पाने आणि बोंडे गळू लागली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला असला, तरी प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com