Crop Damage Surveys Underway as Maharashtra Assesses Eligibility for Drought Relief
esakal
Drought: दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांच्या मदतीवर ‘ट्रिगर’;
नागपूर : राज्यात पहिल्या ट्रिगरच्या आधारे शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असली, तरी शेतकऱ्यांना मदत मिळण्यापूर्वी वनस्पती स्थिती निर्देशांक आणि आर्द्रता पर्याप्तता निर्देशांक या दोन ट्रिगरचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. ते लागू झाले, तरच नुकसानभरपाईच्या पडताळणी होणार आहे.
शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असून, यात विदर्भातील १२० पैकी ९५ तालुके आहेत. सध्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामही वेगाने सुरू आहे. दिवाळीपूर्वी भरपाई दिली जाईल असे सांगण्यात येत असले, तरी मदतीची नेमकी रक्कम किती असेल हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
दुष्काळाची तीव्रता ठरवण्यासाठी आणि मदत जाहीर करण्यासाठी शासनाने २०१८ मध्ये शासन निर्णय जारी केला होता. यात पहिला निकष पर्जन्यमान (पाऊस), दुसरा वनस्पती स्थिती निर्देशांक (एनडीव्हीआय - सामान्य फरक वनस्पती निर्देशांक) आणि आर्द्रता पर्याप्तता निर्देशांक (एमएआय) हे निकष दुष्काळाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जातात. या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच दुष्काळ निश्चित होतो.
उर्वरित दोन निर्देशांकांच्या पडताळणीसाठी माहिती विश्लेषणाचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दुसरा ट्रिगर लागू झाल्यानंतर दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पीक नुकसानीची पडताळणी केली जाईल. या पडताळणीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आढळले, तरच शेतकरी दुष्काळी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार आहेत.
कृषी विभागाकडून पंचनामे सुरू
दुष्काळी भागात कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून नुकसानीचा डेटा संकलित केला जात आहे. तसेच शेतकऱ्यांची बँक खातीही अद्ययावत (अपडेट) केली जात आहेत. निकषांनुसार मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.