नागपूर : हिमालयाच्या दुर्गम भागात असलेला व जगातील सर्वात प्रतिष्ठित ट्रेकपैकी एक मानला जाणारा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक नागपूर व मुंबईतील आठ तरुणांनी यशस्वीरित्या सर करून राज्यातील युवाशक्तीचा अभिमान वाढवला आहे..या साहसी मोहिमेत हितेश बांगडकर (सहाय्यक अभियंता, महाजेनको, कोराडी), निखिल शेंडे (सहाय्यक अभियंता, महाजेनको, चंद्रपूर), प्रतीक करमोरे (सहाय्यक अभियंता, महाजेनको, खापरखेडा), सूरज खोके (सहाय्यक अभियंता, महाजेनको, खापरखेडा), मनीष पुल्लरवार (उपव्यवस्थापक, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, नागपूर), अमोल पाटील (अभियंता, मुंबई मेट्रो), मंगेश पाटील (अभियंता, आरसीएफ मुंबई) आणि प्रीतम गजभिये (अभियंता, आरसीएफ मुंबई) यांचा समावेश होता. वरील साहसवीरांनी समुद्रसपाटीपासून १७,५९८ फूट उंचीवरील हा बेस कॅम्प १४ दिवसांत सर केला..दररोज ६ ते ८ तासांचे पदभ्रमण, उणे १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनची कमतरता, हिमवृष्टी आणि कठीण चढाईचा सामना करत त्यांनी हे लक्ष्य गाठले. ही चढाई त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीची परीक्षा घेणारी होती. ट्रेकर्सनी पुशअप्स करून शरीरसामर्थ्य सिद्ध केले, तर चक्रासन करत योगप्रेमही दाखवले..Nagpur News : सावधान! एआय सिग्नलची तुमच्यावर करडी नजर.हितेश, निखिल, प्रतीक व मनीष या चौघांनी यापूर्वीही एकत्रितपणे चंद्रखानी पास, केदारनाथ आणि चंद्रशिलासारखे ट्रेक केले आहेत. या अनुभवातून मिळालेली समन्वयाची भावना व मैत्री यामुळे यश मिळवणणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेदरम्यान त्यांना अमेरिका, जपान, फ्रांस, नेदरलंड, कोरिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय ट्रेकर्सची भेट होऊन, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. सरकारी व खासगी क्षेत्रातील अधिकारीसुद्धा त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढून, योग्य तयारी, समर्पण आणि ध्येयवेड्या वृत्तीने जगातील सर्वोच्च साहसी मोहिमांमध्ये भाग घेऊ शकतात, हे या मोहिमेने सिद्ध केले. यामुळे समाजातील इतरही तरुणांना प्रेरणा मिळेल, असे त्यांचे मत आहे..एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणे, हा केवळ ट्रेक नव्हता. तर स्वतःला ओळखण्याचा आणि जगाशी जोडण्याचा अनुभव होता. ही मोहीम फिटनेस, मनोबल व संघशक्तीची परीक्षा घेणारी व स्वप्नपूर्ती करणारी होती.- हितेश बांगडकर, साहसवीर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.