

A farmer family in Lohari Sawanga village, Nagpur district, faces financial hardship amid crop losses and irrigation water shortages
esakal
लोहारी सावंगा (जि. नागपूर),: ‘‘तुह्या वावराले मुख्यमंत्री इतवारी व्हिजिट करणार आहे.’’ शेतकरी दिलीप सरोदेला शनिवारी निरोप भेटला. ‘खरंच मुख्यमंत्री गावात आले का?’ हे पाहण्यासाठी तो चौकात जाऊन आला. खात्री पटल्यावर त्याचं मन चलबिचल झालं. रविवारी सकाळी उठल्याबरोबर खुंटीवरचं चांगलं शर्ट काढलं. पण, उजव्या बाहीवर भगदाड होतं. मग त्याने दुपट्टा काढला. उजव्या खांद्यावर टाकला. छिद्र लपवलं. दोन बटना लावून उघडी छातीही झाकली. रात्री थंडीचं घातलेलं टोपरं डोक्यातून काढलं. टोपी चढवली. मुख्यमंत्र्याले शेती दाखवाले दिलीप तयार झाला.