
नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी आणि नाईट सफारीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) इंडिया लिमिटेड या प्रकल्पाचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. प्राणीसंग्रहालयातील भारतीय सफारीच्या यशानंतर हा विकास केला जात आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ५१७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.