
नागपूर : वाहनधारकांची मागणी नसतानाही राज्य सरकारने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नागरिकांना अजून एका उठाठेवीला सामोरे जावे लागत आहे. एचएसआरपीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यात फिटमेंट केंद्र निवडताना नागरिकांना प्रचंड त्रास होत असून जवळचे केंद्रही मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.