
नागपूर : बंजारा भाषा, साहित्य आणि कलेच्या संवर्धनासोबतच राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी, या हेतूने राज्य शासनाने गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन केली. काही प्रसिद्ध बंजारा लेखक व साहित्यिकांना या अशासकीय समितीमधून डावलण्यात आल्याने साहित्य वर्तुळात नाराजी होती. या नाराजीचे सूर उमटत असल्याने ही समिती बरखास्त करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ११) घेण्यात आला.