
नागपूर : बदलत्या काळात वैद्यकीय व्यवसायाबाबत बाजार आणि आजार यातून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते दुरावले आहे. मात्र त्यामधील दुवा म्हणून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल काम करते. डॉक्टरांचे हित जोपासण्यापासून तर विरोधातही रुग्णांकडून तक्रार होत झाल्यास पारदर्शकपणे चौकशी करण्याचे कार्य स्वतंत्र ऑनलाइन वेबपोर्टलच्या माध्यमातून सुरु झाले. तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन डॉक्टरांवर कारवाईची शिफारस करीत कौन्सिल ॲक्शन मोडवर आली आहे.