Tanaji Sawant : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी होणार ‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ कार्यान्वित - डॉ. तानाजी सावंत
Nagpur News : सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागांसह राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्वच विभागांनी औषधी, तत्सम वस्तु आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी करण्यात ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ अपयशी ठरले. यामुळे ‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला.
आठ अधिकारी नेमण्यात येत असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पारदर्शक खरेदी धोरण राबविणारे प्राधिकरण कार्यान्वित होईल, अशी ग्वाही शुक्रवारी (ता.८) राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
मेयो, मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा असल्याचा प्रश्न आ. प्रवीण दटके यांनी उपस्थित केल्यावर याच संदर्भात उपप्रश्न आमदार तटकरे यांनी उपस्थित केला. ‘सकाळ’ने शुक्रवारच्या अंकात ‘सरकारी रुग्णालये आणि औषधांचा तुटवडा’ हे गेल्या १५ वर्षांपासून जणू समीकरणच बनले असल्याची बाब उजेडात आणत खरेदीतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी राज्यात ‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता.
मात्र आठ महिन्यानंतरही प्राधिकरण थंडबस्त्यात असल्याचे वृत्त सकाळने प्रकाशित केले. नेमका हाच विषय विधान परिषदेत उपस्थित केल्यानंतर डॉ. सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा विषय निकाली निघणार असे सांगितले.
या प्राधिकरणावर आठ अधिकाऱ्यांची नेमणूक होत असून येत्या काही दिवसात जिल्हा स्तरावरील ५० अधिकारी नेमण्यात येतील, असे सांगितले. या प्राधिकरणाशी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनी जुळणार असून या सर्व कंपन्यांची गोदामे येथे असतील, असे सूतोवाच त्यांनी दिले.
दर करार ठरविणार
राज्य शासनाचे विविध विभाग दरवर्षी अंदाजे २० ते २५ हजार कोटींची औषधी खरेदी करत असतात. ही खरेदी पारदर्शक व्हावी यासाठी दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) ठरविण्यात येतील. एकदा दर करार ठरल्यानंतर पारदर्शक व्यवहारातून हे प्राधिकरण जिल्हा स्तरावरही कार्यान्वित करण्यात येईल. विभागीय पातळीवर औषधी केंद्र तयार करण्यात येणार असून औषधी खरेदी प्राधिकरणांतर्गत राज्यामध्ये औषधी खरेदीची वार्षिक दिनदर्शिका तयार करणार असल्याची माहिती डॉ. सांवत यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.