
नागपूर : राज्यात पावणेदोन महिन्यात १५ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार वाघांची शिकार, आठ नैसर्गिक आणि दोन अपघाती मृत्यू झाले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक वाघाचे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मध्य प्रदेशात ११ वाघांचा तर देशात ४३ वाघांचा मृत्यू झालेला आहे. केरळ, आसाम, उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी तीन वाघांचा मृत्यू झाल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.