

Nagpur News
esakal
नागपूर: रुग्णांची काळजी घेणाऱ्या निवासी डॉक्टरांची रुग्णसेवेदरम्यान होणारी धावपळ आणि कामाचा ताण, अभ्यास यामुळे खुद्द निवासी डॉक्टरांच्याच आरोग्याचा प्रश्न आता गंभीर होत आहे. त्यातच वरिष्ठांकडून निवासी डॉक्टरांचा होणारा मानसिक छळ यामुळे निवासी डॉक्टरच नैराश्येच्या खाईत लोटले जात आहेत. शासकीय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील ५० टक्केंपेक्षाअधिक डॉक्टरांना मानसिक आरोग्याची जोखीम आहेत.