Winter Session: नागपूरच्या विधिमंडळात मुंबईतील लॅपटॉप लागणार ?

नागपूरच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहात नवीन ध्वनी यंत्रणेसोबत सदस्यांसाठी कायमस्वरूपी लॅपटॉपची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Laptop
LaptopGoogle
Updated on

Assembly Winter Session 2023: नागपूरच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहात नवीन ध्वनी यंत्रणेसोबत सदस्यांसाठी कायमस्वरूपी लॅपटॉपची व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतु यंदा ही यंत्रणा लागणार नसल्याने मुंबईतील लॅपटॉप लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

७ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सत्र नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशनाचे २० डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने १० दिवसांचे कामकाज होईल.

नागपूरचे अधिवेशनाचे सत्र साधारणतः सोमवारपासून सुरू होऊन शुक्रवारी समाप्त होत असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. परंतु यंदा गुरुवारी कामकाज सुरू होणार असून बुधवारी संपणार आहे. मराठा आरक्षण, ड्रग्स तस्करी आदी मुद्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे अपात्र सदस्यांसंदर्भात निकालपत्र देण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम मुदत हिवाळी अधिवेशनानंतरची असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.

यावर्षी ही नवीन यंत्रणा लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु यावर्षी ही यंत्रणा लागणार नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे लॅपटॉप हे मुंबईतून येथे आणण्यात येणार असल्याचे आहे.शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडली असून एक गट सत्तेत सहभागी आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला उबाठा शेजारील कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Laptop
Cabinet Decisions: धनगरांच्या उत्कर्षासाठी योजना ते एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार; पाहा मंत्रिमंडळाचे निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com