Tiger Reserves: राज्यातील व्याघ्र प्रकल्पांची पुन्हा परीक्षा ;एनटीसीएची समिती येणार; व्यवस्थापन, संवर्धन आणि संरक्षणाच्या कामांचे होणार मूल्यमापन

Tiger Reserve Management Assessment: महाराष्ट्रातील पेंच, ताडोबा-अंधारी, मेळघाटसह सहा व्याघ्र प्रकल्पांचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून मूल्यमापन होणार असून, व्यवस्थापन गुणवत्ता आणि व्याघ्र संवर्धनाच्या कामगिरीची तपासणी केली जाणार आहे.
NTCA committee to assess management quality and tiger conservation efforts across six tiger reserves in Maharashtra.

NTCA committee to assess management quality and tiger conservation efforts across six tiger reserves in Maharashtra.

esakal

Updated on: 

नागपूर : देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनाची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (एनटीसीए) विशेष समिती या महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. यात राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या व्यवस्थापन परिणामकारकतेचे मूल्यमापन केले जाणार आहे.

या मूल्यमापनाच्या आधारे प्रत्येक प्रकल्पाला गुणवत्ता श्रेणी दिली जाणार आहे. ती मिळविण्यासाठी सहाही व्याघ्र प्रकल्पांचे प्रशासन जय्यत तयारीला लागले आहे. या मुल्यांकनासाठी चार समित्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Loading content, please wait...