
नागपूर : शेतीच्या बांधावरील पारंपरिक अरुंद शेतरस्ते आता ३ ते ४ मीटर, म्हणजे जवळपास १२ फूट रुंद करण्याचा क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय महसूल विभागाने घेतला. महाराष्ट्राचा आधुनिक शेतीकडे वाढता कल, मोठ्या कृषी अवजारांची वाहतूक तसेच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.