
नागपूर : विदर्भात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३० वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सध्या वाघाच्या मृत्युदरात अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश, कर्नाटकाचा समावेश असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडेवारीवरून दिसते.