
International Tiger Day : ९७ टक्के वाघ विदर्भात
नागपूर : वाघाच्या मृत्यूंची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असली तरी २०२२ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत राज्यात ३९६ वाघ असल्याची माहिती पुढे आली आहे. एकट्या विदर्भात ३८५ वाघ संचार करीत आहेत. राज्यातील एकूण वाघांपैकी ९७ टक्के वाघ विदर्भात असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २३५ पेक्षा अधिक आहेत. आज झालेल्या एनटीसीएच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
मार्जारकुळातील सर्वाधिक शक्तीशाली प्राणी म्हणजे वाघ. शक्तीचे प्रतीक असलेला हा प्राणी जंगलाची शानच. भारतातील विस्तीर्ण आणि घनदाट वनांमध्ये वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थे शास्त्रिय पद्धतीने अहवाल तयार केला आहे. चार वर्षानंतर होणारी प्रगणना यंदा केली. मात्र, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाने वनमजूर महिलेवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्धारित तारखेपर्यंत काही ठिकाणी प्रगणना पूर्ण झाली नाही. त्यामुळेच मागील वर्षीचाच अहवाल पाठविला होता. त्याचा आधार यात गणणेत घेतला आहे.
दर चार वर्षाची वाघांसह जंगलातील तृणभक्षक आणि इतरही प्राण्यांची स्थिती काय आहे याची माहिती घेण्यासाठी प्रगणना केली. भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६ मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती. आता त्याच पद्धतीने व्याघ्र प्रगणनेची मोहीम राबविली जात आहे. २००६ ते २०२० पर्यंत दरवर्षी राज्यात २० ते २५ टक्के वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यानुसार यंदाही वाघांची संख्या वाढणार आहे. ती ३९६ वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२१ या वर्षाचा विदर्भातील वाघ आणि तृणभक्षक प्राण्यांचा अहवाल तयार केला आहे. त्यात राज्यात अंदाजे (३७६-४३३) वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतातील संख्या
२००६ १,४११,
२०१० १,७०६
२०१४ २,२२६,
२०१८ २,९६७
राज्यातील संख्या
२००६ १०३
२०१० १६८
२०१४ १९०
२०१८ ३१२
राज्य सरकारने राबविलेल्या सकारात्मक धोरण, वन संवर्धन आणि व्यवस्थापनामुळे राज्यात वाघांची संख्या सतत वाढत आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांनी केलेल्या जागरुकतेमुळेही संवर्धनाला मदत झालेली आहे. मात्र, वाघांची वाढलेली संख्या वनविभागासमोर आव्हान आहे. देशात आणि राज्यात तीस टक्के वाघाची वाढ होईल असे अपेक्षित आहे
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
Web Title: Maharashtra Total 396 Tigers 97 Percent Tigers In Vidarbha Chandrapur District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..